Chhatrapati Sambhajinagar:संभाजीनगर अल्पाईन रुग्णालयाचा भांडाफोड,'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
Chhatrapati Sambhajinagar:संभाजीनगर अल्पाईन रुग्णालयाचा भांडाफोड,'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात शासकीय योजनेत उपचार करण्यासाठी रुग्णांकडून पैसे लाटले जात असल्याचा प्रकार एबीपी माझाने समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. विशेष म्हणजे ज्या अल्पाईन हॉस्पीटलचा माझाने भांडाफोड केला त्या रुग्णालयाची चौकशी देखील करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. याच प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण खुद्द चौकशी करण्याऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनीच तक्रारदाराला तडजोड करून रुग्णालयाशी मध्यस्थी करण्यासाठी होकार दिला असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोग्य अधिकाऱ्याचा फोन कॉलची तक्रारदाराने फोन कॉल रेकॉर्ड केल्याचंही समोर आलंय.