Chhatrapati Sambhaji Nagar Crime : एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केला छळ, विद्यार्थीनीनं संपवलं जीवन

Continues below advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केला  छळ, विद्यार्थीनीनं संपवलं जीवन
छत्रपती संभाजीनगरमधल्या दौलताबादमध्ये एका १५ वर्षांच्या विद्यार्थीनीनं एकतर्फी प्रेमाच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केलीय. हा छळ दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच शाळेतील एका शिक्षकानं केलाय. या शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्यात. अजय जयवंत सासवडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे. या मुलीच्या आईनं मुलीचं दप्तर उघडल्यानंतर त्यात सापडलेल्या डायरीवरुन या घटनेचा खुलासा झाला. या घटनेनंतर आता आता आपल्या मुलींना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न सध्या पालकांसमोर निर्माण झालाय. 

छ. संभाजीनगरमध्ये शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्या

दप्तरात सापडलेल्या डायरीमधून झाला खुलासा

'आई मी तुला सांगू शकत नाही', डायरीत उल्लेख

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram