Chhatrapati Sambhaji Nagar fire : संभाजीनगरच्या पटेल चौकमध्ये इमारतीला आग, स्थानिकांच्या प्रतिक्रिया

Chhatrapati Sambhaji Nagar fire : संभाजीनगरच्या पटेल चौकमध्ये इमारतीला आग, स्थानिकांच्या प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात एका इमारतीला आग लागली, यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. 
इमारतीच्या तळमजल्यावर कपड्याचं दुकान होतं. आग या दुकानात लागली आणि नंतर वरच्या मजल्यांवर पसरली असा प्राथमिक अंदाज आहे. या तीन मजली इमारतीत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी सात जण राहत होते, तर तिसऱ्या मजल्यावर दोघं राहायचे. पहाटे तीनच्या सुमाराला भीषण आग लागल्यावर पहिल्या मजल्यावरच्या रहिवाशांना आसपासच्या लोकांनी झोपेतून उठवलं. त्यामुळे ते वेळेत बाहेर पडले आणि त्यांचा जीव वाचला. पण दुर्दैवानं दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांच्या कुटुंबात एकालाही जाग आली नाही, ज्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola