Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये ब्राह्मण समाजाचा एल्गार,विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा

मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता आपल्या मागण्यांसाठी ब्राह्मण संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय..  दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे आज ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चाला सुरुवात झालीये. यासाठी सर्व ब्राह्मण संघटना एकत्रित आल्या आहेत. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसंच समाजातील विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण मोफत करावं या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय. .


 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola