Chhatrapati sambhaji Nagar : बीई-बीटेक इलेक्ट्रॉनिक्स परीक्षेत सावळा गोंधळ : ABP Majha
अभियांत्रिकी विद्यालयात सध्या बीई बीटेकच्या सहाव्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स सहाव्या सत्राच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने तात्काळ दुसरी प्रश्नपत्रिका पाठवली त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली. दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान हा पेपर होता. हा पेपर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठवला .परीक्षा केंद्रावर हा पेपर डाऊनलोड केल्यानंतर घडलेला प्रकार लक्षात आला. आता यासंदर्भात कुलगुरू के व्ही काळे यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय.