Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये राडा
Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये राडा,
छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगरमध्ये पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला. पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले असता नागरिकांनी दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी सकाळीच महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी त्यांना विरोध करत रस्त्यावरच ठिय्या केला. यावेळी महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.