Sambhajinagar : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीचा शो बंद पाडण्याचा बजरंग दलाचा प्रयत्न

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न बजरंग दल कार्यकर्त्यांनी केला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी ५ ते ६ जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तापडिया नाट्यमंदिरात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरचा शो आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तापडिया नाट्यमंदिरात पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नसल्याने पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घातली, आणि त्यानंतर शो पुन्हा सुरू झाला. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram