Abdul Sattar Meet Kalyan Kale : गळाभेट,हार ते पुष्पगुच्छ! दानवेंना पाडणाऱ्या काळेंचा सत्तारांकडून सत्कार!

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर: माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी एकनाथ शिंदे यांचा माझ्यावरचा विश्वास संपेल, त्यादिवशी मी योग्य निर्णय घेईन, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. जालना लोकसभा (Jalna Lok Sabha) मतदारसंघात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा दारुण पराभव झाला होता.  जालना लोकसभेत अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळू शकले नव्हते. सिल्लोड मतदारसंघातील महायुतीची कामगिरी चर्चेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. 

यावेळी अब्दुल सत्तार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. मी एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आहे. आमचे संबंध चांगले आहेत. 2019 मध्ये जे घडलं होतं त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे होते. त्यावेळी ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते. माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी योग्य तो निर्णय घेईन, असे सत्तार यांनी म्हटले. सत्तारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

माझ्या नावात सत्तारमध्ये सत्ता आहे. मी म्हणालो होतो संदिपान भुमरे आणि दानवे जिंकणार. मी 5 लाखाची शर्यत लावली होती आणि जिंकली. खैरे यांनी आपल्याच पक्षाच्या लोकांवर विश्वास ठेवला. रावसाहेब दानवे माझे जवळचे मित्र आहेत, पण हृदयातील मित्र काळे आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram