Chhath Puja 2020 | मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेला बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMCचा निर्णय

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. छटपूजेमुळं समुद्रकिनारी होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणीच भाविकांना परवानगी देण्यात येणार आहे. तिथेच भाविकांना निर्माल्य टाकता येणार आहे. दरम्यान मुंबई मुंबई महापालिकेच्या निर्णयानंतर भाजपनं सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केलीय. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola