Nagpur | नागपूरच्या सुभाष नगर भागात तीन वळूंचा धुडगूस, दोन वळू जेरबंद, एक वळू अद्यापही मोकाट!
Continues below advertisement
नागपूर : उपराजधानीतील सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात धुडगूस घालणा-या मन्या आणी दाऊदला जेरबंद करण्यात आले आहे. तर याकूब अजून ही मोकाट आहे. लवकरच त्याला जेरबंद केले जाणार आहे. मनपाच्या कोंडवाडा पथकानं काल रात्री ही कारवाई केली आहे.. विशेष म्हणजे मन्या, दाऊद आणि याकूब या वळूच्या दहशतीची बातमी एबीपी माझा ने दाखविली होती. त्यानंतर काल रात्री वळूंना पकडण्याची मोहिम सुरु करण्यात आली.
Continues below advertisement