Chandrapur Teakwood for Ayodhya Ram Mandir : अयोध्या राममंदिराला गडचिरोलीतील सागवान लाकूड
Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचं काम जोरात सुरू आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे... आलापल्लीच्या सागवन लाकडाची मागणी जगभरात आहे.... हे सागवान लाकूड आलापल्लीवरुन बल्लारपूरच्या दिशेने रवाना झालंय... बल्लारपूर येथील वनविकास मंडळाच्या डेपोमध्ये हे सागवान लाकूड आज पोहचणार आहे आणि त्यानंतर उद्या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सागवानाची विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्त उद्या चंद्रपुरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन कऱण्यात आलं आहे.
Continues below advertisement