Hansraj Ahir : Balu Dhanorkar यांचे माझ्यावर उपकार; धानोरकरांच्या अंत्ययात्रेत हंसराज अहीर भावुक
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वरोरा इथं त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरोऱ्यात जाऊन धानोरकर यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, खासदार इम्रान प्रतापगढी, सुनील केदार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत यांच्यासह अन्य नेते अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असणार आहेत.
Tags :
Balu Dhanorkar Hansraj Ahir Maharashtra Congress Balu Dhanorkar Death CHandrapur Balu Dhanorkar Funeral