Chandrapur : 2.26 कोटींच्या दोन पुलासाठी सरकारला मोजावे लागणार 541 कोटी, का भरावा लागतोय भुर्दंड?
Chandrapur Bridge Story: दोन पुलांसाठी बांधकाम खर्च दोन कोटी 26 लाख रुपयांचा खर्च झाला. पण, सरकारला याचे 541 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल..पण, हे खरं आहे.. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारे पोथरा नदीवर खंबाडा पूल आणि शिरनाई असे दोन पूल आहेत. खरंतर हे दोन्ही पूल होते इंग्रजकालीन आहेत. पण, त्यांच्या डागडुजीसाठी 1997 साली एक निविदा निघाली, आणि गोष्टीला तेथूनच सुरुवात झाली.