Chandrpaur :अयोध्या राममंदिरासाठी महाराष्ट्रातून सागवान लाकूड रवाना,काष्ठपूजन आणि शोभायात्रेचा आढावा
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचं काम जोरात सुरू आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे... हे सागवान लाकूड आलापल्लीहून बल्लारपूरमध्ये काल दाखल झालंय..काष्ठपुजनासाठी पंडितांकडून मंत्रोच्चार सुरु आहेत.. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सागवानाची विधिवत पूजा होणार आहे.बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे... या निमित्त आज चंद्रपुरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन कऱण्यात आलं आहे.