Chandrapur Mayor : चंद्रपूरवर हायकमांडचा तोडगा, काँग्रेस खा. प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर

नवी दिल्ली : राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघाला आहे. यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्याने त्याची जमावाजमव करण्याची जबाबदारी ही धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. 

चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौरपदाचा तोडगा निघत नव्हता. शेवटी विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या 18 समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली. 

नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते के सी वेणूगोपाल यांच्या निवासस्थानी विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनिल केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये महापौरपदाच्या वादावर तोडगा निघाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola