Chandrapur Gram Panchayat Election : सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झालीय... यंदाची ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व आहे कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे... 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतल्या 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी मतदान केलं जातंय.. ... सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय..