Chandrapur Gram Panchayat Election: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-भाजपची कांटे की टक्कर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ८ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व तालका मुख्यालयातून ईव्हीएम मशिन्स आणि कर्मचारी रवाना करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झालीय. भाजप आणि काँग्रेसमध्ये या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळतेय. राजुरा आणि जिवती तालुक्यात काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर वरोरा तालुक्यात काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांची आणि सावली आणि ब्रह्मपुरीत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.