Chandrapur : रामभक्तांच्या स्वागताला महाराष्ट्राचं द्वार, बल्लारपुरात आज काष्ठपूजन आणि शोभायात्रा
Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचं काम जोरात सुरू आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे... हे सागवान लाकूड आलापल्लीहून बल्लारपूरमध्ये काल दाखल झालंय.. आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सागवानाची विधिवत पूजा करतील आणि त्यानंतर बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्त आज चंद्रपुरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन कऱण्यात आलं आहे. दुपारी 3.30 वाजता काष्ठपूजन आणि शोभायात्रेस सुरूवात होणार... या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत
Continues below advertisement