Chandrapur Flood : चंद्रपूर शहर अजूनही पुराच्या विळख्यात
Continues below advertisement
चंद्रपूर शहर अजूनही पुराच्या विळख्यात आहे. गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात वर्धा आणि इरई नदीचे बॅक वॉटर शिरले होते. एकीकडे चंद्रपूर शहरालगतचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचाही विसर्ग केला जात होता. त्यामुळेच शहरातील राजनगर- सहारा पार्क- सिस्टर कॉलनी- रहमत नगर या भागातील अनेक नागरिक पुराच्या विळख्यात आहेत. हा पूर ओसरायला २४ तास लागणार आहेत. या भागातील महापुराची रोहन पांचभाई यांनी ड्रोनद्वारे टिपलेली ही काही दृश्ये..
Continues below advertisement