Chandrapur Fire : चंद्रपूरमध्ये चंदनाची एक हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील १ हजार चंदनाची झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. जयंत नौकरकार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी २ वर्ष आधी आपल्या शेतात चंदनाची १ हजार आणि इतर  फळांची ६०० झाडं लावली होती. मात्र दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली. या आगीत शेतकऱ्याचं जवळपास २० लाख रुपयांचं नुकसान झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola