Chandrapur Crime : चंद्रपुरात 3 महिन्यांपूर्वी झालेल्या एका खुनाचा उलगडा मोबाईल कॉल रेकॉर्डिंग
मोबाईल कॉल रेकॉर्डिंग अनेक प्रकरणात पुरावा म्हणून वापरल्याच्या अनेक घटना आपल्यासमोर आहेत.. मात्र अशा कॉल रेकॉर्डिंगमुळे चंद्रपुरात ३ महिन्यांपूर्वी झालेल्या एका खुनाचा उलगडा झालाय. चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये श्याम रामटेके या ६६ वर्षीय व्यक्तीचाा ६ ऑगस्टला मृत्यू झाला. हार्ट अॅटॅकनं झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. या घटनेला तीन महिने उलटल्यानंतर मृत श्याम रामटेके यांची मुलगी आईसोबत राहण्यासाठी आली. तिनं आईकडून मोबाईल फोन वापरण्यास घेतला होता. त्या मोबाईलमध्ये सापडलेल्या ऑडिओक्लिपवरून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी याला बेड्या ठोकल्या आहेत.