Chandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार

एकीकडे भुयारांनी महिलांबद्दल ही मुक्ताफळं उधळली असतानाच चंद्रपूरमधल्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक झालीय. कोरपनामधल्या खासगी कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. यातला नराधम आरोपी अमोल लोडे हा शिक्षक आणि युवक काँग्रेसचा कोरपना शहराध्यक्ष होता. या संतापजनक घटनेनंतर त्याला अकोल्यातून बेड्या ठोकण्यात आल्यात. आणि काँग्रेसनं त्याची पदावरून हकालपट्टी केलीय. उन्हाळ्यात जादा तास घेण्याच्या बहाण्यानं त्यानं पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला. त्यानंतर आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही मुलीला दिली. पीडित मुलीनं मैत्रिणीला माहिती दिल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीला आला. लोडेविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातल्या पीडितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. लाडक्या बहिणींना पैसे नकोत सुरक्षा द्या, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानंच हा प्रकार केल्यानं खळबळ उडालीय. लोडे असो अथवा भुयार महिला सुरक्षेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी राजकारणात महिलांबद्दलची मानसिकता काय आहे, हे यावरून दिसून येतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola