Tadoba Andhari व्याघ्र प्रकल्पाला गंडा, सफारी करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात गुन्हा Chandrapur

Continues below advertisement

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालंय. या प्रकरणी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सी विरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आलेत.  करारनाम्यानुसार ३ वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा या एजन्सीने केला. तर उर्वरित १२ कोटी १५ लाखांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram