Metro Car Shed | मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्रानं पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण - सचिन सावंत
Continues below advertisement
मुंबई : मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने देखील कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. तरीही मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 22 सप्टेंबर 2015 रोजी अश्विनी भिडे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं होतं. मेट्रो 3 साठी ही जमीन उपयुक्त आहे, त्याशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी अशक्य आहे. इतकंच नाही तर 20 एप्रिल 2019 मध्ये प्रवीण दराडे यांनी देखील मेट्रो 6 च्या कास्टिंग यार्डसाठी कांजूरमार्गच्या जागेसाठी पत्र लिहिले होते, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तर अचानक मिळालेल्या सत्तेमुळे सर्व मंत्री भांबावलेत, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
Continues below advertisement
Tags :
Metro Metro Car Shed Mumbai Metro Car Shed Kanjurmarg Metro Special Report Aarey CM Uddhav Thackeray