Bhujbal PC OBC Reservation:केंद्राचा डेटा सदोष,मग देवेंद्र फडणवीसांनी कोणता डेटा मागितला? -छगन भुजबळ

Continues below advertisement

मागासवर्गीय आयोगानं आपलं काम जलदगतीने केले तर ओबीसींना राजकीय आरक्षण शक्य असल्याचे  मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कोणत्याही सरकारची चूक असली तरी लोकांची काय चूक असंही भुजबळ यावेळी म्हणाले. येणाऱ्या निवडणुका जनरलमधून होतील, मात्र, पुढच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता सर्व अधिकारी, सचिवांसह  संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा हातात घेण गरजेच असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. ओबीसींच्या आरक्षणावर मार्ग निघत नसेल तर आंदोलन उभ राहिल, त्यामध्ये आम्हीपण सामील होऊ असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram