CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा

Continues below advertisement

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा 

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी मतदान सुरू असताना 88 सदस्यांच्या परिषदेवर इस्रायलने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, इराणकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले असून हल्ल्यापूर्वीच संबंधित इमारत रिकामी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तेहरान आणि बेरूतवर नव्या लष्करी कारवाया (Tehran Beirut Military Strikes)

इस्रायली सैन्याने तेहरान आणि बेरूतमध्ये लष्करी तळांवर नव्याने हल्ले सुरू केल्याची माहिती आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनी स्पष्ट केले की, इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता पूर्णपणे संपविण्यापर्यंत ही कारवाई सुरू राहील. इस्रायली भूसेना लेबनॉनमधील अधिक रणनीतिक भागांकडे पुढे सरकत असल्याचेही वृत्त आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी (Donald Trump Warning)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत इराणला पुन्हा एकदा इशारा दिला. त्यांनी म्हटलं की, “इराणची एअर डिफेन्स, एअर फोर्स, नेव्ही आणि नेतृत्व व्यवस्था संपुष्टात आलं आहे. ते आता चर्चा करू इच्छितात, पण त्याला खूप उशीर झाला आहे.”

पश्चिम आशियातील या वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या संघर्षाचे परिणाम अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola