CBSE Board Syllabus Reduced | सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 30% कमी

Continues below advertisement
कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram