CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाही- शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरीयाल
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.