Wadhwan Controversy | वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात, साताऱ्याहून मुंबईकडे रवानगी
Continues below advertisement
लॉकडाऊनमध्ये गृहविभागाच्या विशेष सचिवांचं पत्र घेऊन महाबळेश्वरला गेलेल्या वाधवान कुटुंबाचा ताबा सीबीआयकडे दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली. वाधवान कुटुंबाला पत्र देणारे गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचीही चौकशी पूर्ण झाली असून गुप्ता यांनी कुणाच्याही दबावाविना पत्र दिल्याचं कबूल केलं. अमिताभ गुप्ता यांनी स्वत: पत्र दिल्याचं कबूल केलं आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. सीबीआयने दोघांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे, त्यांना आता साताऱ्याहून मुंबईला नेण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Wadhwan Controversy Wadhwan Family Kapil Wadhwan Maharashtra Lockdown Sharad Pawar Devendra Fadnavis