Google Maps च्या आधारे जाणाऱ्या कारचं थेट धरणात लॅंडिंग, दोघांचे प्राण वाचले, कार चालकाचा मृत्यू
अहमदनगर : कळसुबाईला ट्रेकिंगसाठी निघालेल्या तीन जणांच्या वाहनाला अपघात झाला आणि गाडी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. या अपघाताला निमित्त ठरलंय गुगल मॅप. अकोले तालुक्यातील कोतुळ गावाजवळील पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यात वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण मात्र बचावले आहेत.