Final year Exam पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल-मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन हा शब्द कचरा पेटीत टाकायला मी आलो आहे. मात्र, हा लॉकडाऊन एकमद उठवण्यात येणार नसून हळूहळू उठवण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे काही लोक म्हणतात, त्यांनी आकडेवारी पाहावी असे, आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. यावेळी त्यांनी राज्यातील आकडेवारी सर्वांसमोर सादर केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola