Waghya Murali Buldana : वाघ्या मुरळी स्पर्धेचं आयोजन,'यळकोट यळकोट जय मल्हार'चा घोष : ABP Majha

बुलढाण्याच्या मेहकरजवळ देऊळगाव माळी येथे वाघ्या मुरळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. यळकोट यळकोट जय मल्हारचा घोष करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून वाघ्या मुरळीच्या पार्ट्या दाखल झाल्या होत्या. या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमांमधून स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा, लेक शिकवा, व्यसनाधीनता तसेच ग्राम स्वच्छतेसह अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. भंडारा उधळत गायलेल्या गीतांना उपस्थितांची चांगली पसंती लाभली. बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या या लोककला आजही जीवंत ठेवल्या आहेत. त्याचीच प्रचिती या स्पर्धेदरम्यान आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola