Uddhav Thackeray Full Speech Buldhana : तुमच्याकडे धनसंपत्ती असेल माझ्याकडे जनसंपत्ती आहे - ठाकरे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Full Speech Buldhana : तुमच्याकडे धनसंपत्ती असेल माझ्याकडे जनसंपत्ती आहे - ठाकरे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जनसंवाद यात्रा होती बुलढाण्याची जागा ही महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे गटाला सुटलेली असल्याने प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा संभावित उमेदवार म्हणून घोषणाही करण्यात आली आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी आजही सिंदखेड राजा व मेहकर येथील सभेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा कुठलाही उल्लेख केला नाही किंवा त्यांच्या उमेदवारीबद्दल कुठलीही वाच्यता केली नाही याउलट त्यांनी मेहकर येथील सभेत शेवटी जनतेला आवाहन करत जनतेकडून वचन घेतला आहे की मी जो उमेदवार देईल तो तुम्ही निवडून देणार की नाही...? मात्र आजही प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा किंवा त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पाचही सभेत उद्धव ठाकरे यांनी केला नसल्याने पुन्हा बुलढाणा जिल्ह्यात उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.