Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तुटलेला भाग दुरूस्त केला पण पुन्हा परिस्थिती जैसे थे
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तुटलेला भाग दुरूस्त केला पण पुन्हा परिस्थिती जैसे थे पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वरील दुसर बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडे भाग तुटून वर आलेला होता. याची बातमी एबीपी माझा दाखवल्यानंतर तात्काळ या पूलाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने याची फक्त थातूरमातूर वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा हा भाग तुटलेला असून हा पुन्हा कधी महामार्गावर उचकटून येऊ शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो. चेनेज 319 वर हा लोखंडी भाग असून हा लोखंडे भाग अद्यापही तुटलेलाच आहे .समृद्धी महामार्ग प्रशासनाने याची याची गंभीर दखल न घेता तात्पुरती वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा तीनच दिवसात हा भाग तुटून हलायला लागलेला आहे .व कधीही वर येऊन या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे...अतिशय गंभीर हा प्रकार आहे...