Ravikant Tupkar Wife detained : आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
Ravikant Tupkar Wife detained : आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा: शेतकरी हिताचे निर्णय न घेतल्यास 19 तारखेपासून मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू असा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर विविध आंदोलनं करत आहेत. याबाबतीत शासन स्तरावर त्यांची बैठकसुद्धा झाली. परंतु आपल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रविकांत तुपकरांनी शुक्रवारी मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Ravikant Tupkar