Ravikant Tupkar मुंबईच्या दिशेने रवाना होणार, सोयाबीन-कापूसप्रश्नी आक्रमक भूमिका

Continues below advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघणार आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या ६०० कार्यकर्त्यांसह ६० ते ७० गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना , औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार आहेत. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा - सिल्लोड - औरंगाबाद - नगर - पूणे मार्गे जाऊन मुंबई जवळ अज्ञात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करून २४ नोव्हेंबरला सकाळीच मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram