Ravikant Tupkar Protest Buldhana : बुलढाण्य़ात रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरुच

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला... यावेळी पोलिसांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला... त्याप्रकरणी तुपकरांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय... सध्या तुपकर पोलिसांच्या ताब्यात असून काल रात्रीपासून त्यांनी काहीही खाल्लं नाहीये... लाठीचार्ज कऱणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय... पोलिसांनी मात्र लाठीचार्ज केला नसल्याचं सांगितलंय.. दरम्यान आत्मदहन आंंदोलनाप्रकऱणी तुपकरांसह १८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल कऱण्यात आलेत. तर काल वाशिमच्या मालेगाव बस स्थानकावर एका उभ्या एसटी बसच्या काचादेखील फोडण्यात आल्या... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola