Buldhana : ठाकरे गटाचं नरेंद्र खेडेकरांना तिकीट जवळपास निश्चित, 21 आणि 22 फेब्रुवारीला ठाकरेंचा दौरा
Buldhana : बुलढाण्यातून ठाकरे गटाचं नरेंद्र खेडेकरांना तिकीट जवळपास निश्चित, 21 आणि 22 फेब्रुवारीला ठाकरेंचा दौरा
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. २१ आणि २२ फेब्रुवारीला ठाकरे बुलढाण्याचा दौरा करणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत. त्यांना नरेंद्र खेडेकर आव्हान देणार आहेत. मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक आज पार पडली. या बैठकीला संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, इतर पदाधिकारी उपस्थित होते. खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख होते. सध्या ते बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.