Buldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावर
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र जमवण्यासाठी ग्रामीण भागात महिलांची मोठी धावपळ बघायला मिळत आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील तलाठी हा महिलांची आरवी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला याची बातमी एबीपी माझाने दाखवताच..... खेरडा या ठिकाणी जळगाव जामोद तहसीलदार शितल सोलाट या पोहोचल्या मात्र तहसीलदार पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने या ठिकाणी तलाठी पोहोचले आणि कार्यालय उघडलं मात्र कार्यालय उघडतात जमलेल्या नागरिकांनी या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ घातला तलाठ्यांनी प्रत्येक व्यक्तीकडून काल तीस ते शंभर रुपये घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी तलाठी आणि तहसीलदारांना धारेवर धरलं हा सर्व प्रकार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला.... मात्र माध्यमांचा कॅमेरा हे सर्व रेकॉर्ड करत असल्याचे बघून तहसीलदार शितल सोलाट यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला मात्र बराच वेळ महिला आणि पुरुषांनी या ठिकाणी गोंधळ घालत तलाठ्याने पैसे घेतल्याचा आरोप करत मोठ्या गोंधळ घातला