Buldhana Sindkhed Raja:उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर, 13व्या शतकातील मंदिर यादवकालीन असल्याचा दावा
सिंदखेड राजा येथे उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर, राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात सापडलं शिवमंदिर, १३ व्या शतकातील मंदिर यादवकालीन असल्याचा दावा, भारतीय पुरातत्व विभागाने केली मंदिराची पाहणी.
बुलढाण्यातील सिंदखेज राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्वाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीन पूर्व मुख्य शिवमंदिर सापडलं आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून या मंदिराची पाहणी केली. हे मंदिर सापडल्याने पुरातत्त्व विभागाच्या अधिक्षकांनी या मंदिराची पाहणी केली. तसंच दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर उत्खननादरम्यान सापडल्याने अजूनही या परिसरात काही पुरातत्त्व वास्तू सापडण्याची शक्यता आहे. तसंच या सापडलेल्या पुरातत्त्व मंदिराचा सखोल अभ्यास करणार असल्याचंही भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी सांगितलंय..