Buldhana : रविकांत तुपकर यांचा पुन्हा आत्मदहनाचा इशारा, जिल्हा पोलीस सतर्क ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.. सोयाबीन कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत, तसेच पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केलीये.. तर मागील तीन महिन्यापासून तुपकर हे आंदोलन करत आहेत. मात्र सरकार काही याकडे लक्ष देत नसल्याने आज तुपकरांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय.. त्यामुळे या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतलीये.. या आंदोलनावर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय... मात्र तुपकर हे काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भूमिगत झाले असून मुंबई आणि बुलढाणा पोलिसांचं टेंशन वाढलंय.
Continues below advertisement