Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती

Continues below advertisement

Buldhana Murti : बुलढाण्यातील उत्खननात सापडली शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती  राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननास सापडली शेषशायी विष्णू व लक्ष्मीची मूर्ती. मूर्ती अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज. समाधी परिसराचे  उत्खनन करून अभ्यास करणार .-अरुण मलिक आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती. या मूर्तीच उत्खनन अतिशय बारकाईने सुरू असून पूर्ण मूर्ती बाहेर काढण्यास अजून चार ते पाच दिवस लागतील अशी माहिती आहे.  सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचे जीर्णोद्धार जतन व संवर्धनाचे काम अनेक महिन्यापासून सुरू आहे हे काम सुरू असताना काल अचानक शेषशायी विष्णू भगवान व लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट उंच शेष नागावर आसनस्त असलेली अत्यंत सुरेख व रेखीव मूर्ती सापडली आहे व आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याचे बोलले जात आहे. या सर्व परिसराचे आगामी काळात बारकाईने उत्खनन करण्यात येणार असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी  सांगितल.  आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर व आकर्षक मूर्ती.  ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करतांना आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर व अत्यंत आकर्षक सुबक नक्षीकाम केलेली शेषशायी विष्णू लक्ष्मीची भव्य साडेतीन फुटाची मूर्ती सापडली असल्याचं बोललं जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram