Buldhana Matka Racket : संत नगरीत मटका रॅकेट, पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 2.50 कोटींचा मुद्देमाल जप्त

संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरातील पोलिसांचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे शेगावमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला धाड टाकावी लागली आहे. अमरावती रेंजचें विशेष आयजी आदित्य मिरखीलकर यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेगावातील हॉटेल गौरवमध्ये जुगार अड्डा, मटका, अवैध दारू आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिरखीलकर यांना मिळाली. त्यांनी तातडीनं एक पथक तयार करून तिथं धाड टाकली, आणि ८० उच्चभ्रू जुगाऱ्यांना अटक केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola