Buldhana Jigaon Project : बुलढाण्यातील जीगाव प्रकल्प 28 वर्षानंतर पूर्ण होणार? नेमका कसा आहे हा प्र
Continues below advertisement
विदर्भातील एक मोठा प्रकल्प असलेला नांदुरा तालुक्यातील जीगाव प्रकल्प तब्बल 28 वर्षांनी पूर्ण होण्याची शक्यता आहे.. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 1 हजार 790 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलीये... 1994 साली सुरु झालेल्या या प्रकल्पाचं काम जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं आहे.. 2024 मध्ये या प्रकल्पात 350 दशलक्ष घनमीटर पाणी अडवण्याची तयारी सुरु आहे... सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत 735 कोटी रुपये होती... मात्र अनेक अडचणींमुळे विलंब झाल्याने याची किंमत तब्बल 17 हजार 500 कोटींच्या घरात पोहचली आहे... दरम्यान हा प्रकल्प पश्चिम विदर्भातील आणि विशेषतः बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील खार पानपट्ट्याला वरदान ठरणारा आहे.
Continues below advertisement