Buldhana Farmer : बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यांत तूर पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल : ABP Majha

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा खरीप हंगामात जवळपास साडे सहा लाख हेक्टर शेतीत तुरीच पीक लागवड करण्यात आली आहे , यंदा पावसाळा ही चांगला झाल्याने बुलढाणा , अकोला , वाशीम सह मराठवाडा व  उत्तर महाराष्ट्रातील तुरीच पीक अतिशय चांगलं होत...... मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरात बदललेल्या वातावरणामुळे राज्यभरातील तुरीवर " फायटॉपथोरा ब्लाईट " या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने होत्याच नव्हतं झालंय........ या विषाणूजन्य रोगामुळे एकाच आठवड्यात हिरवीगार असलेलं तुरीच पीक अक्षरशः सुकल्याने त्यातील अपरिपक्व तुरीच मोठं नुकसान झालं आहे...... राज्यात लाखो हेक्टरवरील तूर अक्षरशः एकाच आठवड्यात सुकल्याने यावर्षी ही तुरीच पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे....! अतिवृष्टी , वारंवार बदलत असलेलं वातावरण त्यामुळे खरीप हंगामात अनेक पिकांचं नुकसान झालं असताना शेतकऱयांना तुरीच्या पिकावर मोठी आशा होती मात्र गेल्या काही दिवसापूर्वी हिरवेगार तुरीच्या पिकाकडे बघून स्वप्न रंगवत असतानाच पुन्हा आता शेतकरी अडचणीत सापडलाय....!. तुरीवर विषाणूजन्य रोगामुळे आता एकरी चार क्विंटल होणार तुरीच पीक हे एकरी पन्नास किलोवर आलं आहे....त्यामुळे आता शेतकऱयांना पुन्हा सरकारकडे मदतीची अपेक्षा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram