Buldana Water Shortage : बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई आणि दुष्काळाची चाहूल : ABP Majha
Continues below advertisement
यावर्षी कमी पाऊस पडल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तलाव आणि धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ४८% पाऊस झालाय. त्यामुुळं ऑगस्ट महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागलीय. ऐन पावसाळ्यात प्रशासनाने जिल्ह्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. तर जिल्ह्यातील ९९ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामुळं यंदा नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता निर्माण झालीय.
Continues below advertisement