Buldhana Accident : समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू : ABP Majha

छत्रपती संभाजी नगर हून शेगावकडे भरधाव वेगाने समृद्धी महामर्गवरून जात असलेल्या मारुती सुझुकी अर्टीका कार पलटल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. समृद्धी महामार्गावर मेहकर जवळील सिवनिपिसा गावाजवळ आज सकाळी साडे आठ वाजता हा अपघात घडला. नागपूर कॉरिडॉर वरील चेनेज 99 ते 100 दरम्यान हा अपघात घडला , तात्काळ समृद्धी महामार्गावरील क्विक रिस्पॉन्स पथक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तत्काळ मेहकर येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलं असून या कार मध्ये 13 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी असून त्यांचेवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून यातील पाच जणांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola