Buldhana : बुलढाण्यात दोन गटात हाणामारी, महिलेच्या घरासमोर फटाके फोडल्याने 15 जण अटकेत
Continues below advertisement
Buldhana : बुलढाण्यात दोन गटात हाणामारी, महिलेच्या घरासमोर फटाके फोडल्याने 15 जण अटकेत
बुलढाण्यातील मेहकर इथे दोन गटात झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. काही युवकांनी महिलेच्या घरासमोर फटाके फोडले. या प्रकरणी विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी २५ जणांविरुद्ध दंगल करणे, विनयभंग करण्याचे गंभीर गुन्हे केले दाखल करुन १५ जणांना अटक केली आहे. दरम्यान संबंधित महिला ही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची नातेवाईक असल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर मेहकर शहरात तणावाची परिस्थिती आहे. पोलीस घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
Continues below advertisement