Buldana Crime : पोलीस पत्नी आणि मुलीचा घेतला जीव, आणि पतीनं जीवन संपवलं : ABP Majha

Continues below advertisement

बुलढाण्याच्या चिखलीत पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची हत्या करून पतीने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केलीय. विशेष म्हणजे पत्नी पोलीस होती. त्यामुळे या हत्यांका़डाने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडालीय. चिखली शहरातील खामगाव मार्गावरील पंचमुखी महादेव मंदिर परिसरातीस ही घटना आहे. व्यवसायाने शेतकरी असलेल्या किशोर कुटे यांनी पोलीस असलेल्या पत्नी वर्षा दंडाळे आणि चार वर्षे चिमुरडी कृष्णाई यांची हत्या केली. त्यानंतर चिखलीपासून २० किलोमीटरवरील एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरगुती वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram