Bhendwal Ghatmandni 2024 : राजा बदलणार की तोच राहणार? यंदा भेंडवळची भाकणूक काय?
Continues below advertisement
Bhendwal Ghatmandni : राजा बदलणार की तोच राहणार? यंदा भेंडवळची भाकणूक काय?
बुलढाणा : शेतकरी आणि राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भेंडवळची घट मांडणी (Bhendwal Ghatmandni) शुक्रवारी करण्यात आली. सूर्यास्ताच्या वेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी भेंडवळ गावाबाहेर एका शेतात घट मांडणीची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचं निरीक्षण करून आगामी वर्षभराचे शेतीसंबंधी पावसा संबंधी, देशाच्या राजकीय भविष्यावर अंदाज वर्तविले गेले आहेत.
या घटमांडणीवेळी विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शनिवारी सकाळी सूर्योदयावेळी नेमके काय अंदाज व्यक्त होतात हे जाणून घेण्यासाठी आज रात्री परिसरासह राज्यभरातून शेतकरी व राजकीय नेते भेंडवळ येथे आता मुक्कामी असणार आहेत.
Continues below advertisement